10वीच्या परिक्षेतही गोंदिया विभागात दूसरा, दोन विद्यार्थीनी 100 टक्के गुणासह जिल्ह्यात अव्वल

0
184

गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता आभासी पद्धतीने जाहीर झाला, यात नागपूर विभागात १२ वी नंतर आता दहावीच्या परीक्षेतही गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९२.०४ टक्के लागला असून विभागात नागपूर ९३.४५ टक्के नंतर गोंदिया जिल्हा दुसर्‍यास्थानी आहे. जिल्ह्यातील ७८ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून गोंदियाच्या विवेक मंदिर शाळेतील हर्षिता अनिल मदनकर व स्वाती सुनीलकुमार श्रीभाद्रे या दोन विद्यार्थीनींनी १०० टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here