गोंदिया : दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. कालपासून तर पावसाने जोर धरला असून मुसळधार सुरू आहे. सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील 20 च्या जवळपास मार्गही बंद पडले आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. असे असताना अतिवृष्टीसदृश्य पावसातही जिल्ह्यातील शाळाना सुट्टी देण्यात आलेली नाही.
गोंदिया जिल्ह्यातील हे मार्ग बंद झाले 20
वडेगाव ते खोलदा
दिनकरनगर ते करांडली
प्रतापगढ ते कडोली
प्रतापगढ ते रामनगर
इलदा ते वडेगाव
चीचेवडा ते मुर्दोली
डवकी ते शिलापुर
गोटाबोडी ते बोरगाव
शेडेपार रस्ता
सिंगांडोह- रोपा
ककोडी/चिलाटी-
चीचगड-देवरी रोडवर परसोडी
बोरी ते मांडोखाल
कोरंबी टोला ते मांडोखाल
सिलेझरी ते येरंडी( विहीरगाव )
महागाव, शिरोली, ईटखेडा रस्ते
बोंडगाव / देवी ते खांबी व चान्ना ते बोंडगाव / देवी
गोंडमोहाडी- अर्जुनी
घाटकुरोडा-घोगरा
सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला ते घटेगाव
किंडगीपार ते जवरी पूल वाहतूक बंद