Saturday, July 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील समस्यांवर आमदार राजकुमार बडोले यांचा सवाल

गोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील समस्यांवर आमदार राजकुमार बडोले यांचा सवाल

उत्तम आरोग्य सुविधा हा नागरिकांचा हक्क : राजकुमार बडोले
गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मधे अर्जुनी मोरगावचे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील गंभीर समस्यांवर प्रश्नोत्तराच्या तासात आवाज उठवला. या रुग्णालयात गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून मोठ्या संख्येने गरोदर महिला उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयातील अनेक समस्यांमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन राजकुमार बडोले यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना केले. रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असून रुग्णालयात बेडची कमतरता आणि भ्रष्टाचार होत आहे. बेड मिळवण्यासाठी लाच मागितली जात असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे. सोनोग्राफी मशीन वारंवार बंद असते, ज्यामुळे महिलांना तपासणीसाठी तारीख पे तारीख दिली जाते आणि रुग्णालयात तज्ञ डॉक्टर बऱ्याचदा उपलब्ध नसतात. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी राहण्याची सोय नसल्याने त्यांच्या अडचणी वाढतात म्हणून धर्मशाळा रुग्णालय परिसरात असली पाहिजे. वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णांना दूरवरील केटीएस रुग्णालयात जावे लागते. तसेच पूर्वी मोफत असलेल्या ओपीडी आणि चाचण्यांसाठी आता शुल्क आकारले जात असून या सोयी परत निशुल्क करणे आवश्यक आहे.  ब्लड सेपरेशन मशीन नसल्याने सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्ताची कमतरता होत असून या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही. अशा तमाम समस्यांवर माजी मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
या प्रश्नांना उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, रक्तपेढीतील ब्लड सेपरेशन यूनिटसाठी केंद्रीय आणि राज्यस्तरीय पथक २१ जुलै रोजी बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर एका महिन्याच्या आत ब्लड सेपरेशन यूनिट उपलब्ध होऊ शकते. तसेच, रुग्णालयातील इतर समस्यांवर विशेष बैठक घेण्यात येईल आणि चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

क्षेत्राचा आवाज बुलंद करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले आघाडीवर
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये, अर्जुनी मोरगावचे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील समस्यांवर अत्यंत प्रभावीपणे आणि आक्रमकपणे आवाज उठवत आपली दूरदृष्टी आणि जनसेवेची अटल बांधिलकी दाखवून दिली. आमदार राजकुमार बडोले या अधिवेशनात केवळ प्रश्न उपस्थित करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्य सुविधांच्या सुधारणेसाठी सातत्यपूर्ण, निर्भीड आणि परिणामकारक पाठपुरावा करत त्यांचे नेतृत्वगुण आणि जनतेच्या समस्यांप्रती असलेली तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित केली. ज्यामुळे त्यांची जनसंपर्क आणि पारदर्शकतेची वचनबद्धता दिसून आली. आमदार बडोले यांनी या अधिवेशनात आपल्या संवेदनशील, सक्रिय आणि जनकेंद्रित दृष्टिकोनाने एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ख्याती आणखी दृढ केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गोंदिया जिल्ह्यातील व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments