गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री गोरख भामरे, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने आज दिनांक ०७/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया च्या पोलीस पथक जिल्हा हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती प्राप्त झाली कि मौजा कारंजा ते फुलचूर रोडवरून १ इसम मोटर सायकल ने अंमली पदार्थ गांजाची वाहतूक करून घेऊन जाणार आहे.
मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक, श्री पुरुषोत्तम अहेरकर, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण अंतर्गत कारंजा ते फुलचूर रोडवर अंमली पदार्थ गांजा बाळगून वाहतूक करणाऱ्या एक आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी किशोर सुहाकार हातझाडे वय ३४ वर्ष राहणार मालकानपूर तालुका अर्जुनीमोर जिल्हा गोंदिया यास खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथील कारंजा ते फुलचूर रोडवर पंचासमक्ष ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीत आरोपीजवळ असलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये पाहणी करण्यात आली असता प्लास्टिक पिशवीमध्ये १) सेलो टेपनी गुंडाळलेले १ बंडल ज्यामध्ये ९८५ ग्रॅम ओलसर पाने, फुले, बिया मिश्रित गांजा किंमती १९,७००/- रुपये, २) आरोपीकडे असलेल्या बजाज कंपनीचा पल्सर मोटर सायकल किमती १,००,०००/- व इतर साहित्य असा एकुण किंमती १,१९,७००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तो पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करून आरोपीस गांजाबाबत विचारपूस केली असता मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा हे विक्री करिता घेऊन जात असल्याचे सांगितले तरी त्याचे विरोधात पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे सहायक फौजदार भुवनलाल देशमुख , नेमणूक स्थागुशा गोंदिया यांचे तक्रारी वरून गुन्हा क्रमांक ८३/२०२६ एन. डी.पी. एस. कायद्या कलम 8 (क), 20 (ब), (दोन)(अ ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत. सदरची दर्जेदार धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर, सहायक फौजदार राजू मिश्रा, भुवनलाल देशमुख , पोहवा महेश मेहर, पोहवा संजय चौहान, पोहवा इंद्रजित बिसेन, पोहवा प्रकाश गायधने, पोशि छगन विठ्ठले, मपोशि स्मिता तोंडरे, कुमुद येरणे , चापोशि राम खंदारे, यांनी कारवाई केलेली आहे.
985 ग्रॅम गांजा व 1 मोटर सायकल सहित 1,19,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES






