Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेलांच्या 120व्या जयंतीनिमित्त अभिवादन

शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेलांच्या 120व्या जयंतीनिमित्त अभिवादन

गोंदिया. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा वाहत ठेवत ‘गोंदिया शिक्षण संस्था’ या नावाने शिक्षणरूपी वटवृक्ष रोवून दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारे, शिक्षणमहर्षी व स्वनामधन्य नेते स्व. मनोहरभाई पटेल (बाबूजी) यांच्या १२० व्या पावन जयंतीनिमित्त मनोहरभाई पटेल नॉलेज सिटी परिसर, कुडवा (गोंदिया) येथे ‘हर मन के मीत’ स्व. मनोहरभाई पटेल (बाबूजी) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धासुमने वाहण्यात आली.या पावन प्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल राजेंद्र जैन यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबूजींना विनम्र अभिवादन केले.यावेळी सर्वश्री अजय शर्मा, रविंद्र मोहतुरे, राजेंद्र निकोसे, शारदा महाजन, हरगोविंद चौरसिया, रूपा मिश्रा, मनीषा मिश्रा, शफी उल्ला खान, दिलीप चौधरी, मनोज पटले, सुशील पालीवाल, एजाज शेख, विजय मोहबे, गोपेश बाजपेयी, बोस, संतोष सोनी यांच्यासह संस्थेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments