नळ जोडणी धारकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा

0
236

गोंदिया : गोंदिया शहरातील नागरिकांना गोंदिया पाणी पुरवठा योजनेमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरातील बऱ्याच नळ जोडणी ग्राहकांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. त्यामुळे गोंदिया शहरातील ज्या नळ जोडणी धारकांकडे पाणीपट्टीची थकबाकी शिल्लक आहे, अशा ग्राहकांनी संपूर्ण पाणीपट्टीची मुद्दल रक्कम भरुन 100 टक्के व्याजामध्ये माफिचा लाभ 31 मार्च पर्यंत घेण्यात यावा. व्याजमाफीची अभय योजनेची मुदत दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत आहे. निर्धारीत तारखेनंतर व्याजामध्ये कुठल्याही प्रकारची माफी देण्यात येणार नाही. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन.एस.गणवीर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here