मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी 4 डिसेंबरला जिल्ह्यात

0
196

गोंदिया : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रथम भेटीबाबत मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी हया गोंदिया जिल्ह्यात येणार आहेत. या भेटीत त्या लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना भेटतील.
भारत निवडणूक आयोगाचे 29 मे 2023 चे पत्रान्वये दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित झाला असून भारत निवडणूक आयोगाचे दिनांक 22 सप्टेंबर 2023 चे पत्रानुसार विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी तपासणीच्या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक म्हणून भेट दयावयाच्या असल्याने दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रथम भेटीबाबत मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी हया गोंदिया जिल्ह्यात येणार आहेत. विजयलक्ष्मी बिदरी, मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8983019814 हा सर्व जनतेसाठी कळविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here