शेतीचा वादातून चुलत भावाने केला चाकूने हल्ला

0
196

गोंदिया : शेतीच्या वादातून चुलत भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली.
आरोपी उमेश भगवान पुराम (२४) या तरुणाने लालचंद पुराम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरीटोला येथील वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना आरोपी चुलतभाऊ उमेश भगवान पुराम (२४) हा मोटारसायकल घेऊन बिरसा मुंडा पुतळ्याजवळ आला. हातात तलवार घेऊन तो लालचंद बळीराम पुराम (३८) यांच्या दिशेने धावला. मात्र, तलवार विश्वास शिवकुमार तुमसरे याने हिसकावली असता तो पुन्हा २० मिनिटांनी चाकू घेऊन आला आणि लालचंद यांच्यावर मागून हल्ला केला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here