Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedGONDIA: 9 वर्षीय यथार्थ संग्रामेने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले सुवर्ण, रौप्य आणि...

GONDIA: 9 वर्षीय यथार्थ संग्रामेने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक..

 

गोंदिया, 15 जानेवारी
कोल्हापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्थानिक श्रीनगर येथील जलपटू यथार्थ महेंद्र संग्रामे (9) याने सुवर्णपदकासह रजत व कांस्यपदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.


श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सवानिमित्त स्विमिंग हब फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलावात करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन मधुरिमाराजे यांनी केले. प्रसंगी भारत डेअरीचे चिराग मेहता, विक्रांत पाटील-किणीकर, प्रा. एम. बी. शेख प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, कनार्टक, गोवा, तामिळनाडू, ओरिसा आदी राज्यातील 8 ते 21 वयोगटातील 325 खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा 134 प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत गोंदिया यथार्थ संग्रामे याने सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक पटकाविले. यथार्थने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व प्रशिक्षकांना दिले. त्याच्या यशाबद्दल त्याचे जिल्हावासीयांकडून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments