गोंदिया(18जाने.). गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच जिल्ह्या तील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्या करीता पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे यांनी विशेष पथकास याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरु आहे.
या अनुषंगाने आज दिनांक-18/01/2023 रोजी विशेष पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे- गंगाझरी परीसरातील मौजा- मंगेझरी येथे रात्र दरम्यान नाकाबंदी करून 12.30 वाजता दरम्यान छापा कारवाई केली.
या कार्रवाई मध्ये 1) इमरान रियाज खान वय 27 वर्षे रा. चंगेरा ता.जि- गोंदिया हा मिळून आला. तर त्याचा सहकारी 2) मंगलेश मारबते रा. चंगेरा हा रात्रीचा व जंगलाचा फायदा घेवून पळून गेला.
मिळून आलेल्या इसमाचे ताब्यातील चारचाकी आयसर ट्रक वाहन क्र MH 36 F – 3533 वाहनामध्ये एकुण 20 बैल, गाय, गोरे (लाल, पांढऱ्या, काळया रंगाची जनावरे) अवैध रित्या, निर्दयतेने कोंबून, डांबुन व बांधुन त्यांचे चारा- अन्न पाण्याची कोणतीही सोय व व्यवस्था न करता वाहतुक करतांनी मिळुन आले.
सदर मिळून आलेल्या चारचाकी आयसर ट्रक वाहन क्र MH 36 F – 3533 चे डाल्याची पाहणी केली असता ताडपत्री झाकलेल्या ट्रकचे डाल्यामध्ये 20 नग बैल, गाय, गोरे जातीची जनावरे कोणत्याही प्रकारची हालचाल न करता कोंबलेल्या स्थितीत दिसुन आल्याने चारचाकी आयसर ट्रक वाहन क्र MH 36 F – 3533 किंमती अंदाजे 12,00,000/-रु. व 20 जनावरे (बैल, गाय, गोरे) किंमती 1,40,000 /- रू. असा एकुण 13, लाख 40 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच आयसर ट्रकच्या डाल्या मधील जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या करीता सुकृत गौशाला कल्याणकारी संस्था, खैरी पो. पिंपळगाव ता. लाखनी जि. भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर प्रकरणी आरोपी आरोपी नामे 1) इमरान रियाज खान वय 27 वर्षे रा. चंगेरा ता.जि- गोंदिया, ( 2) फरार आरोपी- मंगलेश मारबते रा. चंगेरा ता.जि- गोंदिया यांचे विरुध्द पोलीस ठाणे गंगाझरी येथे कलम 11(1) (ड) (ई) (ग) (फ) (ह) प्रा. नि. वा. का. 1960, सह कलम 5(अ), 2, 9 महा. पशु.सं.अधि. 1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे. आरोपी यास गंगाझरी पोलीसचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही गंगाझरी पोलीस करीत आहेत.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत, चा.पो.शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.