Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedअंगणवाडी बालवाडी कर्मचारी, सेविकांचे आंदोलन सुरुच

अंगणवाडी बालवाडी कर्मचारी, सेविकांचे आंदोलन सुरुच

गोंदिया : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक व कृति समीतीद्वारे अगणंवाडी सेविका मदतनिस यांनी मानधंनात वाढ करा या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदवित काळा दिवस पाळला.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन लागू करा, कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, ग्रेच्युटी लागू करा, मदतनिसांना प्रमोशन दया, मिनी अंगणवाडीला अगणंवाडी दर्जा दया इत्यादी मागण्यांसाठी ४ डिंसेबरपासुन राज्य व्यापी संप सुरू आहे. २ लाखच्यावर अंगणवाडी सेविका संपात सहभागी झाल्या आहेत. परंतु राज्य शासन अगणंवाडी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.हे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर सुरु असल्याने शासनाने आता सर्वच अंगणवाडी सेविका,सहायिकांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत,त्या आदेशाला न मानण्याचा संघटनेने इशारा दिला आहे.
मोर्चाचे नेतृत्व आयटक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, आयटक जिल्हा सचिव रामचंद्र पाटिल, शकुंतला फटींग, जिल्हा अध्यक्ष विठा पवार, राज्य सचिव पोणिॅमा चुटे, जिल्हा सचिव जीवन कला वैद्य, कोषाध्यक्ष आम्रकला डोंगरे, विना राजलक्ष्मी हरिनखेडे, उपाध्यक्ष सुनीता मंलगाम, बिरजूला तिडंके, पुष्पा भगत, सहसचिव अजंना ठाकरे, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, दुर्गा संतापे, शामकला मसराम, काचंन शहारे, मिनाक्षी राऊत, वंदना पटले यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments