Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedअसंघटित देहाड़ी मजुर व कामगारांना केंद्रीय आवास योजने चा लाभ देण्याची रेखलाल...

असंघटित देहाड़ी मजुर व कामगारांना केंद्रीय आवास योजने चा लाभ देण्याची रेखलाल टेंभरे यांची मागणी

 

गोंदिया। विदर्भ च्या अनेक जिल्ह्यात असंघटित देहाडी मजुर केंद्रीय व राज्यस्तरीय घरकुल योजने पासून वंचित आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही. अशा वंचित कामगार व मजुरांना केंद्रीय घरकुल योजने चा लाभ देण्याची मागणी भाजप नेते रेखलाल टेंभरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवुन केली. विदर्भ च्या ११ जिल्ह्यात ७५ प्रतिशत मजुर व कामगार घरकुल योजने पासून वंचित आहेत, त्यांना नियम व अटी च्या कारणांमुळे प्रधानमंत्री आवास योजने चा लाभ मिळत नाही. राज्य शासनाच्या योजने पासून ते वंचित आहेत.अनेक कामगार व मजुर झुग्गी झोपडी मध्ये किंवा भाड्याच्या घरात राहतात. आर्थिक दुर्बलतेच्या कारणांमुळे ते स्वतःचे घर खरेदी करू शकत नाही. यामुळे केंद्र सरकारने पुख्त नियमांमध्ये दुरुस्ती करून या मजुर व कामगारांना आवासीय योजने चा त्वरित लाभ देण्याची मागणी रेखलाल टेंभरे यांनी निवेदनात केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments