Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedआणखी एका धोकादायक गुंडाविरुद्ध MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कार्यवाही

आणखी एका धोकादायक गुंडाविरुद्ध MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कार्यवाही

एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह नागपूर केले स्थानबद्ध
गोंदिया : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर MPDA (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया रोहिणी बानकर, मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे आदेश अरविंद रामटेके वय 22 वर्षे राहणार – गीरोला (दासगाव) तालुका – जिल्हा गोंदिया याचेविरुद्ध एमपीडीए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव मंजुरी करिता पाठविण्यात आलेला होता.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, गोंदिया प्रजित नायर, यांनी नमूद धोकादायक गुंड इसमाविरूद्ध दिनांक- 08/04/2024 रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एम.पी.डी.ए.) कायद्यांतर्गंत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन रावणवाडी हद्दीतील सराईत धोकादायक गुन्हेगार गुंड ईसंम नामे आदेश अरविंद रामटेके याच्याविरुद्ध MPDA कायादयाअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.. दिनांक- 09/04/2024 रोजी नमूद गुन्हेगारास मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे एक वर्षा करीता दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हेगारांवर 5 गंभीर गुन्ह्याची नोंद असुन त्यामध्ये दुखापत करणे, चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, चाकूचा धाक दाखवून गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, विनयभंग करणे, अन्यायाने गृह प्रवेश नुकसानी करणे अश्या विविध प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात म.पो.उप.नि. वनिता सायकर, पो.हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, यांनी व पो.ठाणे रावणवाडी चे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर, यांचे नेतृत्वात स.पो.नि.सुनील अंबुरे, पोहवा. संजय चव्हान, पो.शि. छगन विठ्ठले, तसेच उपविभाग तिरोडा येथील पो. हवा. गोस्वामी यांनी कार्यवाही केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments