गोंदिया : 19 मार्च रोजी जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन म्हशीनच्या मृत्यू झाला. तिरोडा तालुक्यातील वीरसी येथील शेतकरी पंथीलाल पारधी यांच्या 2 म्हशी वीरसी स्मशान घाटाजवळ चरत असताना अचानक आल्याने थोड्याशा वादळामुळे जिवंत विद्युत तारा पडून या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन्ही म्हशीचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची घटना 19 रोजी दुपारी 12 वाजताचे दरम्यान घडली. यात शेतकऱ्याचे जवळपास 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक गजरे व डॉक्टर मयूरेश हलबुर्गे यांनी म्हशीचे शव विच्छेदन केले असून विज वितरण कंपनीने लवकरात लवकर शेतकऱ्यास नूकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
इलेक्ट्रिक करंट लागून दोन म्हशींचा मृत्यू
RELATED ARTICLES