Thursday, July 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedखूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

गोंदिया : पार्टी करताना झालेल्या वाद-विवादात मित्राला खूप दारू पाजून त्याचा खून करण्यात आला. त्याचा पत्ता घरच्यांना लागू नये म्हणून त्याचा मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकून देण्यात आला. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. राकेश सुकचरण उईके (३८, रा. पिपरिया, ता. सालेकसा) असे मृताचे नाव आहे. या घटनेसंदर्भात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली नाही. आमगावसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गोंदिया पोलिस कारवाई करताना सतर्कता बाळगत आहेत.
सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरिया येथील आरोपी प्रकाश चमरूलाल भौतिक (४०), मृतक राकेश सुकचरण उईके (३८) व गावातीलच अन्य दोन असे चार जण १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता गावातीलच जंगलात पार्टी करायला गेले. मद्यप्राशन करून त्यांनी मटण पार्टी केली. त्यानंतर तिघेही परत गावाकडे आले. मृत व्यक्तीने अति प्रमाणात मद्यप्राशन केले असल्याने तो पार्टी करण्याच्या ठिकाणीच पडून होता. घराकडे माघारी आलेल्या आरोपीने परत जाऊन सालेकसा तालुक्याच्या गल्लाटोला येथील तिलक उपराडे यांच्या शेतात त्याचा गळा आवळून खून केला. २० ऑक्टोबर रोजी छोटी बाघनदी पात्रातील राणीडोहाच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. यासंदर्भात मृतकची पत्नी बबीता राकेश उईके (३५, रा. पिपरिया) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments