गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आज दि 11 एप्रिल 23 रोजी महात्मा
ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी पुष्पहार घालून आदरांजली अर्पित केली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत उपेक्षितांना जगण्याची उमेद देणारे स्त्री शिक्षणासाठी अपार मेहनत घेणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आजच्या पिढीने आमलात आणले पाहिजेत
या प्रसंगी बाई गंगाबाई रुग्णालयाच्या अधिसेविका अर्चना वासनिक यांच्या नेतृत्वात श्रीमती रुपाली टोने, रत्नमाला रामटेके, मृदुला तेलंग’ पल्लवी वासनिक रुपाली गेडाम,नीलम शुक्ल तृप्ती बाजपाई नितु फुले कॅशियर श्री अंबादास भीमटे गंगाबाई हॉस्पिटल मधील गोंदिया चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी
संघटनेचे सचिव श्री खगेंद्र शिवरकर प्रयोगशाळा अधिकारी श्री संतोषसिंग नायकाने श्री सुनील गोंदाने श्री कापगते आदी हॉस्पिटल परोमेडीकल स्टाफ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पित केली.
गंगाबाई मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात
RELATED ARTICLES