गोंदिया : येथील आमगाव रोडवरील खमारी येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या नियोजित जागेवर 18 जानेवारी रोजी जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या हस्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विधिवत पद्धतीने पंडित मैत्रेय यांच्या द्वारे पूजन करून भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने खा. सुनील मेंढे, जि प अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले, माजी आ. रमेशभाऊ कुथे, जि प सभापती संजय टेंभरे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिलाध्यक्ष भावना कदम, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, संतोष चौहान, दिनेश दादरीवाल, दीपक कदम, राजेश चतुर, डॉ. प्रशांत कटरे, गजेंद्र फूंडे, जे डी जगणीत, हनुवत वट्टी, नारायण चांदवानी, जयंत शुक्ला,डॉ लक्ष्मण भगत, भुमेश्वर पटले, मनोहर आसवानी, महेश आहूजा, राजू नोतानी, ऋषिकांत साहू, जितेंद्र पंचबुद्धे, बाबा बिसेन, संजय मुरकुटे,
शंभूशरणसिंह ठाकुर, सुनिल तिवारी, शालिनी डोंगरे, चित्रलेखा चौधरी, निर्मला मिश्रा, धर्मिष्ठा सेंगर, शुभा भारद्वाज, सरीता कुलकर्णी, अंकित जैन, गोल्डी गावंडे, मिलींद शेवाळे, तिजेश गौतम, धनंजय रिनायत, सुधीर ब्राह्मणकर, विनोद चांदवानी, बबली ठाकूर, चंद्रभान तरोने, खेमचंद शेंडे, राकेश अग्रवाल, योगेश मानकर, पंकज उईके, प्रवीण पटले, मंगलेश गिरी, अनुकूल शर्मा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.