गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या ग्राम पंचायत बाम्हणी येथील ग्रामसेविका संजू भुराजी खोब्रागडे (४७) यांना जातिवाचक शिवगाळ करणाऱ्या ग्राम पंचायत सदस्यासह दोघांवर सालेकसा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष चैनलाल दसरीया व ओमप्रकाश भैय्यालाल नागपुरे दोन्ही रा. पठाणटोला अशी आरोपींची नावे आहेत.
ग्राम पंचायत बाम्हणू येथे खोब्रागडे ह्या फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहेत. त्यांनी कामात अनियमीतता करून भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करीत गावातील ४० ते ५० लोक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ग्राम पंचायत येथे गेले होते. ग्राम पंचायत मध्ये मासीक सभा सुरू असतांनाच लोक पोहचल्याने त्यात धिंगाणा घालण्यात आला. अध्यक्षांनी सभा बंद केली. दुपारी २ वाजता ग्रामसेविका ह्या सालेकसा जाण्यासाठी निघाल्या असतांना दोन्ही आरोपींनी ग्राम पंचायत कार्यालयासमोर त्यांची गाडी अडवून त्यांना जातिवाचक शिविगाळ केली. तुला गावात राहू देणार नाही, तुला निलंबित करायला लावतो थांब अशी धमकी दिली. या घटनेसंदर्भात १० नोव्हेंबर रोजी सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ३४१, ५०४, ५०६ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (आर), ३ (२), (व्ही.ए.), ३ (१) (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामसेविकेला जातिवाचक शिवगाळ, दोघांवर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES