गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
गोंदिया : तालुक्यातील शेंद्रीटोला पिंडकेपार येथील सुनिता दिप पोवरे यांच्या घरातून 55 हजार 700 रूपयांची घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी 24 तासात अटक करण्यात यश आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी 55 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कमलेश रमेश कटंगकर (वय 25) व मधु हीराजी कुर्वे (वय 56) दोन्ही रा. सेंद्रीटोला, पिंडकेपार, ता. गोंदिया असे आरोपींचे नावे आहेत.
पिंडकेपार शेंद्रीटोला येथील सुनिता दिप पोवरे (वय 35) ही 17 मार्च रोजी तिचे मुळगावी कामानिमित्त गेली होती. त्यांच्या घराचे दाराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी एल.सी.डी. टी. व्ही., किंमत 9000, टी. व्ही. रिसीव्हर किं. 1000 रु, सोन्याचे बिरी 15000, सोन्याची नथ 9000, सोन्याचे मनी किंमत 20000, नगदी 1700 रूपये असा एकूण 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले होते. फिर्यादीच्या रिपोर्टवरुन 24 मार्च रोजी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे पो. ठाणे गोंदिया शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार सदर गुन्ह्याचा छडा लावत असतांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे घरफोडी करणाऱ्या कमलेश रमेश कटंगकर याला 25 मार्च रोजी गुन्ह्यांत अटक करुन पोलिस कोठडी रिमांड (पी.सी.आर.) घेण्यात आले. तपासात त्याचा साथीदार मधु हीराजी कुर्वे याला 26 मार्च रोजी अटक करण्यात आली. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल संबंधात विचारपूस केली असता दोन्हीं अरोपितांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल एक एल.सी.डी.टी.व्ही., टी.व्ही.चे रिसीव्हर, सोन्याचे बिरी, सोन्याची नथ, सोन्याचे मनी, नगदी 1500 रूपये असा एकूण 55500 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया सुनिल ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदियाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटी करण पथकाचे स.पो.नि. सागर पाटील, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, ओमेश्वर मेश्राम, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पो.शि. दिनेश बिसेन, पुरुषोत्तम देशमुख, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली. तपास पो.हवा. दिपक रहांगडाले करीत आहेत.
घरफोडीच्या दोन गुन्हेगारांना 24 तासात अटक
RELATED ARTICLES