Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedजननायक, महामानव बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रत्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायक : राजेंद्र जैन

जननायक, महामानव बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रत्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायक : राजेंद्र जैन

गोंदिया : आदिवासी समाज ब्रिटीश सरकार व जमीनदाराचे दमन अश्या दुहेरी शोषणात जिवन जगत होता. या शोषणाविरुद्ध आदिवासी समाजात जागृती करून महामानव, जननायक बिरसा मुंडा यांनी आवाज उठवला होता. त्यांनी जल, जंगल, जमीन च्या हक्कासाठी बलिदान देऊन आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्रवीर ठरले, येणाऱ्या कित्येक पिढ्या त्यांच्या या संघर्षातून प्रेरणा घेतील असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले.

आदिवासी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा स्मारक समिती व आदिवासी विकास संस्था च्या वतीने हनुमान मंदिर परिसर मेंगाटोला (पाथरी) येथे महामानव क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा 148 जयंती समारोह व ध्वजारोहण सोहळा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत पार पडला. माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी क्रांतिसूर्य, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जनजातीय गौरव दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. राजेंद्र जैन, केवल बघेले, केतन तुरकर, पन्नालाल बोपचे, सुनील कापसे, अनिल मडावी, ब्रिजलाल बिसेन, दूनेश्ररजी, भूमेश्वर राऊत, के. एल. वरखडे, गिरिपुंजेजी, घनश्याम येल्ले सहीत मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments