Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedजिप सदस्यावर अपात्रतेच्या कारवाईस दिरंगाई

जिप सदस्यावर अपात्रतेच्या कारवाईस दिरंगाई

गोंदिया : इटखेडा येथील जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांचेविरुद्ध इंद्रदास लक्ष्मण झिलपे यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी चार महिन्यांपासून नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रकरण दाखल केले. मात्र अद्याप याप्रकरणी कुठलीच कारवाई झाली नाही. राजकीय दबावामुळेच कारवाईस दिरंगाई होत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
सन २०२२ मध्ये पौर्णिमा ढेंगे या इटखेडा जि प क्षेत्रातून निवडून आल्या होत्या. त्या सध्या गोंदिया जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती आहेत. पोर्णिमा ढेंगे यांचे पती उमाकांत यांचे नावे इटखेडा येथे मालमत्ता क्रमांक १०९० दर्ज आहे. ढेंगे कुटुंबीय इटखेडा येथे संयुक्त हिंदू कुटुंबात एकत्र राहतात. पोर्णिमा यांचे मृत सासरे व दिरांच्या नावे वेगवेगळ्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांवर करांचे मागणी बिल, मागणीचे लेख बजावूनही कराचा भरणा केला नाही. ईटखेडा गाव नमुना ८ नुसार मालमत्ता क्रमांक ८६६ ही उमाकांत ढेंगे यांच्या नावे आहे. या मालमत्तेवरील कर २०२२_२३ पासून भरलेला नसल्याची तक्रार झिलपे यांनी केली आहे. २०२४_२५ चे कर आकारणीत घर क्रमांक ८६६ ला नवीन क्रमांक १०९० देण्यात आला. यावरील कराचा भरणा करण्यात आला नाही. पोर्णिमा या जि प सदस्य आहेत. व त्या इटखेडा येथे एकत्र हिंदू कुटुंबात राहतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या टॅक्सचा भरणा करणे आवश्यक आहे. याबाबत त्यांना पुरेपूर माहिती असतानाही तसेच कराची मागणी बिल व कराचा लेख प्राप्त होऊनही सहा महिन्याचे कालावधी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे त्या जि प सदस्य म्हणून राहू शकत नाही. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १६(१) के व कलम ४०(२) नुसार पदावरून अपात्र घोषित करावे. अशी याचिका २४ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्त यांचे कार्यालयात महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, ग्रामपंचायत अधिकारी ईटखेडा व मुख्य कार्यकारी अधिकारी जि प गोंदिया यांचेविरुद्ध दाखल केली आहे. गेल्या चार महिन्यात यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. उपायुक्त विवेक इलमे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना स्वयंस्पष्ट अहवाल, अभिप्रायासह सादर करण्याचे पत्र दिले. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेमधून टाळाटाळ होत असल्याची तक्रार झिलपे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments