गोंदिया : जिल्हा उद्योग मित्र या कार्यक्रमाच्या अंतर्गत गोंदिया येथे जिल्ह्यातील शेतकी उत्पादन निर्यात वाढविण्याच्या विषयावर व स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे बुधवार ला सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेला उपस्थित मा. चिन्मय गोतमारे (जिल्हाधिकारी गोंदिया), मा. हिंदुराव चव्हाण (जिल्हा कृषी अधिकारी गोंदिया), मा. रेखलाल टेंभरे (अध्यक्ष, गोंदिया ऍग्रो प्रो. कं. लि. गोरेगाव), राहुल गणविर (जिल्हा अग्रणी बंक), ममता मेश्राम (लिगल आफिसर एमआयडीसी नागपुर), हुकूमचंद अग्रवाल (अध्यक्ष गोंदिया इंडस्ट्रीयल असोसिएशन एमआयडीसी), अशोक अग्रवाल (अध्यक्ष राईस मिल असोसिएशन), गजानन अग्रवाल (अध्यक्ष लाख उत्पादन प्रक्रिया असोसिएशन), डॉ.सय्यद शाकिर अली (शास्त्रज्ञ पीव्हीके) एमआयडीसी आधी उपस्थित होते सभेमध्ये जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली सविस्तर चर्चा करण्यात आली व प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकी उत्पादनांमध्ये शेतकरी उत्पादनांच्या निर्यात निर्यात मध्ये कशी वाढ करता येईल यावर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे निर्यात वाढविण्यासाठी तिरोडा मध्ये सीडीएस तयार करण्याच्या विषयावर प्रस्ताव पाठविण्याचे ठरले निर्यात वाढवण्यासाठी आधी व्यवस्था व धानाच्या पुरवठा कसा करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी म्हणाले रेकलाल टेंबरे म्हणाले की शेतकऱ्यांनी ज्या उत्पादनांची ज्या गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्यात केली जाते अशाच पिकांच्या उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरून त्यांना शेती फायद्याची ठरेल.
जिल्ह्यातील शेतकी उत्पादन निर्यात वाढवण्यासाठी व स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभेला रेखलाल टेंभरे यांची उपस्थिती
RELATED ARTICLES