गोंदिया : ‘टोपऱ्या’ या टोपणनावाने आवाज दिला यावरून तरुणाने दोघांना कुऱ्हाडीने डोक्यावर मारून जखमी केले. ही घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कुंभारटोली येथे बुद्धविहाराजवळ बुधवारी (दि.२०) रात्री ८:३० वाजता दरम्यान घडली.
फिर्यादी भूमेश्वर गंगाप्रसाद राऊत (३५, रा. तिगाव) हे कुंभारटोली येथील आंबेडकर चौकात पानटपरीवर उभे होते. तेथे भूमेश्वरचा मित्र तुषार नंदेश्वर याने आरोपी गजानन भोलाजी मेश्राम (२६, रा. कोपीटोला) याला ‘टोपऱ्या’ या टोपण नावाने बोलाविले.
यावर गजानन याने तुषारला धक्का देऊन तोंडातोंडी भांडण केले. काही वेळानंतर भूमेश्वर व त्याचे मित्र गावाला जाण्यासाठी निघाले असता गजानन याने त्यांना आवाज देऊन थांबविले. तसेच ‘टोपऱ्या’ या नावाने आवाज दिल्याच्या रागातून भूमेश्वर व तुषार यांना कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून जखमी केले. पोलिसांनी भूमेश्वर राऊत याच्या तक्रारीवरून गजानन मेश्राम विरुद्ध भादंवि कलम ३२४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
‘टोपऱ्या’ म्हणणे पडले भारी, दोघांवर कुऱ्हाडीने वार
RELATED ARTICLES