गोंदिया. आपल्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत असलेल्या गोंदिया जिल्हा पोलीस पाटील संघटनेने प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 19 फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांची भेट घेऊन निवेदन दिले.
पोलीस पाटलांनी संघटनेच्या माध्यमातून मानधनात वाढ, सेवानिवृत्तीचे वय वाढवणे यासह अनेक मागण्या निवेदनात नमूद करून त्यावर शासनस्तरावर तोडगा काढण्याची मागणी केली.
माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी निवेदनाची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलीस पाटलांच्या मागण्या रास्त व योग्य असल्याची ग्वाही दिली.
श्री.फुके म्हणाले, पोलीस पाटलांच्या विविध मागण्या शासन दरबारी ठेऊन ते पूर्ण करण्याचे काम करणार आहे. या प्रकरणाची आपल्याला चांगलीच माहिती असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही केली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस पाटलांच्या मागण्या सोडवतील, असे सकारात्मक आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
ते म्हणाले, मी पोलीस पाटील संघटनेच्या पाठीशी कटिबद्धपणे उभा असून, मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात त्यांच्या मागण्या शासन स्तरावर मांडून त्या सोडवल्या जातील, अशी ग्वाही देतो.
निवेदन देताना गोंदिया जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कोचे, जिल्हा सचिव मनोहरसिंह चौहान, राहुल बोरकर, नीलेश तुरकर, कुंजीलाल भगत, हिवराज ताजने, साहेबराव बनसोड, राजू कडव, क्रांती बिसेन, दिलीप मेश्राम, अरविंद चौरे, दर्याव रिणाईत, हितेश सोनवणे, ज्ञानेश्वर गहाणे, आनंदराव शेंडे, जियालाल जमरे, मुकेश पाचे, भूषण कुमार, अनिता राऊत, हेमराज उईके, दिलीप रिणाईत, निशा रहांगडाले, दुर्गावती कापसे यांच्यासह अनेक पोलीस पाटील पदाधिकारी उपस्थित होते.