Saturday, December 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedढिसाळ नियोजनाचा फटका…. जिल्हास्तरीय पशुुपक्षी प्रदर्शनीकडे पशुुपालकांनी फिरवली पाठ

ढिसाळ नियोजनाचा फटका…. जिल्हास्तरीय पशुुपक्षी प्रदर्शनीकडे पशुुपालकांनी फिरवली पाठ

गोंदिया  : पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद गोंदियाच्यावीने 28 व २९ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील अदासी येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे याकरीता अंदाजे 14 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याचे बोलले जात असून 14 लाखाच्या या पशुपक्षी प्रदर्शनाकडे मात्र पशुपालकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र बघावयास मिळाले.सोबतच जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती  जिल्हा परिषद अध्यक्षापासून उपाध्यक्ष व इतर सभापतींनीही त्या प्रदर्शनीकडे जाण्याचे का टाळले अशा प्रश्न चर्चेचा झालेला आहे.
साडेतीन लााख रुपये खर्चून उभारलेला मंडपात मात्र अवघ्या 250 च्या जवळपासच पशुपशींची नोंद होती.जेव्हा की तालुकास्तरावरील पशुपशी प्रदर्शनीचा आढावा  घेतल्यास 500 च्यावर पशुपक्षींच्या संख्या असताना जिल्हास्तरावरील आयोजनाला ढिसाळ नियोजनाचा फटका बसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.या प्रदर्शनाचा जिल्हा वार्षिक योजनेचा निधी म्हणजे मार्च एंडीगच्या नावे शासकीय निधीची उधळपट्टी असाच कार्यक्रम ठरला.या स्पर्धेमध्ये पाहिजे तशी चुरसच निर्माण होऊ शकली नाही.त्यामुळे मोजक्याच 15-20 गटात आलेल्या पशुपक्षींंची पाहणी करुन निवड होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आभासी पध्दतीने उपस्थित राहून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगांथम होते.पशुसंवर्धन व कृषी सभापती रुपेश कुथे,गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश रहागंडाले,तिरोडा पंचायत समिती सभापती कुंता पटले,जि.प.सदस्या आनंदा वाढिवा,तांडा व अदासी येथील सरपंच,उपसरपंच यांच्यासह इतर मान्यवर उदघाटनप्रसंगी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीमध्ये गोंदिया जिल्हयातील पशुपालकांच्या उत्कृष्ट जनावरांचा देखावा व पुरस्कारपशुसंवर्धन विभागामार्फत विविध तांत्रिक बाबींचे मॉडेल्सव्दारे प्रदर्शन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी पशुप्रदर्शनीचे वैशिष्ट राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र प्रत्यक्ष पशुपक्षी प्रदर्शनीचा आढावा घेतल्यावर मात्र जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे ढिसाळ नियोजनामुळे अर्जुनी मोरगाव,देवरी,सालेकसा सारख्या तालुक्यातील पशुपालक आपले पशुपक्षी याठिकाणी घेऊनच आल्याचे नसल्याचे बघावयास मिळाले.त्यातच 28 फेब्रुवारीपासूनच हे प्रदर्शन असून पहिल्यादेिवशी जे पशुपालक उपस्थित झाले,त्यांचीही मोठी गैरसोय व  झाल्याचे अनेकांनी सांगितले.तर आज 29 फेब्रुवारीला सुध्दा कार्यक्रमाच्या उदघाटनवेळेपर्यंतही जेवण नास्त्याची सोय झाली नसल्याचे अनेकांनी सांगितले.तर उदघाटनानंतर झालेल्या जेवणाच्यावेळी सुध्दा उपस्थितांपैकी अनेकांना जेवण मिळाले नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments