बिग बटरफ्लाय मंथ – 2023” मध्ये नवीन रेकॉर्ड
गोंदिया : सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या फुलपाखरु महिन्याच्या निमित्ताने नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखरांच्या विविधतेच्या हंगामी सर्वेक्षणात नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या जांभळी गेटजवळ दुर्मिळ माकड कोड किंवा मंकी पजल फुलपाखरू (राथिंडा अमोर) नुकतेच दिसून आले. जैवविविधता अभ्यासक व स्थानिक एस.एस.जयस्वाल महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ.गोपाल पालीवाल, प्रा. भीमराव लाडे धाबेपौनी, प्रा. डॉ.सुधीर भांडारकर, एमबी पटेल कॉलेज देवरी यांनी प्रथमच या दुर्मिळ फुलपाखराची माहिती दिली.
यापूर्वी या फुलपाखरूची नोंद भारतातील दक्षिण आणि पूर्वेकडील राज्ये, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात डॉ. टिपले आणि डॉ. भागवत यांनी याच वर्षी यापूर्वी नोंदवले आहे.नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात कोरड्या मिश्र जंगलापासून पावसाच्या जंगलापर्यंतच्या वनस्पतींच्या विविधतेसाठी लोकप्रिय आहे. हे दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरडे जंगल वैविध्यपूर्ण वन्यजीवांनी समृद्ध आहे आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे संरक्षण घटक आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात विविध कुटुंबांतील सुमारे ७० प्रजातींची फुलपाखरे यापूर्वीच दिसली आहेत. मंकी पझल बटरफ्लाय हे लाइकेनिड कुटुंबातील एक आकर्षक फुलपाखरू आहे. नवेगाव नॅशनल पार्कच्या जांभळी गेटजवळ इक्सोरा (जंगल जीरॅनियम) वनस्पती वर हे दिसून येते. इक्सोरा वनस्पती हे माकड कोड फुलपाखराच्या यजमान वनस्पतींपैकी एक आहे.
या फुलपाखराचे सामान्य नाव त्याच्या पंखांखाली दिसनाऱ्या गुंतागुंतीच्या कोड्यासारखे पॅटर्न मूळे किंवा त्याच्या विशिष्ट लँडिंग पॅटर्नमुळे असू शकते.या यशाबद्दल प्राचार्य डॉ.ईश्वर मोहर्ले, डॉ.अरुण झिंगरे, रुपेश निंबाराते, छत्रपाल चौधरी, कुलदीपसिंह बाच्चिल, प्रवीण रणदिवे, विवेक बावनकुळे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी संशोधकांनी अभिनंदन केले आहे.
नवेगाव राष्ट्रीय उद्यानात प्रथमच दुर्मिळ माकड कोड फुलपाखरू दिसले
RELATED ARTICLES