Wednesday, February 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्यायाधीशांच्या हस्ते 50 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ

न्यायाधीशांच्या हस्ते 50 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ

गोंदिया : विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात जिल्ह्यातील 50 लाभार्थ्यांना न्यायाधीशांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.18) डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह, मरारटोली, गोंदिया येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नागपूर खंडपीठ उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती अनिल किलोर, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा गोंदिया न्यायमूर्ती एम.डब्ल्यु.चांदवाणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष राजेश जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी. कटरे, यासह न्यायिक अधिकारी, सर्व वकील वर्ग व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीशांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कलाम स्वयंसहायता बचतगटाच्या योगेश्वरी चौधरी यांना 4 लक्ष रुपयाचा धनादेश, शिवपुरान स्वयंसहायता बचतगटाच्या लिलावती लिल्हारे यांना 7 लक्ष रुपयाचा धनादेश. नगर परिषद कार्यालय गोंदिया मार्फत दिनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत विधान महिला बचत गटाच्या प्रिया देशमातुरे, सुजाता मडामे, लक्ष्मी राठोड यांना प्रत्येकी 4 लक्ष रुपयाचा धनादेश. कलश महिला बचतगटाच्या सरिता मोहनकर, रेशमा मेश्राम, उर्मिला यादव यांना प्रत्येकी 4 लक्ष रुपयाचा धनादेश. पवन महिला बचतगटाच्या सुनिता फुंडे, धनवंता राऊत, लिला मेंढे यांना प्रत्येकी 7 लक्ष रुपयाचा धनादेश. सादर महिला बचतगटाच्या सविता गिरडकर, वंदना मानकर, सुनंदा मुरकुटे यांना प्रत्येकी 7 लक्ष रुपयाचा धनादेश. रमाई आवास योजनेअंतर्गत रविशंगर भालाधरे यांना   1 लक्ष रुपयाचा धनादेश, कस्तुरा रामटेके यांना 25 हजार रुपयाचा धनादेश. दामोदर वडीचार, नरेंद्र कटारे, दुर्गा चौधरी, सकुन पटले, रुपचंद चौव्हाण यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला. तहसील कार्यालय गोंदिया पुरवठा विभागातर्फे 30 लाभार्थ्यांना डिजिटल राशन कार्डचे वाटप. जिल्हा परिषद गोंदिया दिव्यांग सक्षमीकरण विगागामार्फत टिंकल रहांगडाले तांडा व वंश भगत डव्वा यांना व्हील चेअर वाटप. न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांचेकडून पाच दिव्यांगांना स्पेशल किट व खेळाचे साहित्य, तसेच नम्रमा वृध्दाश्रम घोटी यांना व्हीलचेअर. न्यायिक अधिकारी गोंदिया यांचेकडून मंगलम मुकबधीर शाळा गोंदिया यांना दहा बंक बेड, वन विभाग गोंदिया यांचेकडून वन्य प्राण्यांद्वारे होणारे पशुधन व शेतपीक नुकसानभरपाईचे धनादेश. भूमी अभिलेख विभागाकडून सामित्व योजनेअंतर्गत होमराज चौरीवार, छगनलाल चौरीवार, पदमलाल चौरीवार, चरणदास गजभिये, तालिकराम चौधरी यांना सनद वाटप करण्यात आले. या विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात कार्यक्रमस्थळी लावलेल्या एकूण 40 स्टॉल्सवरुन जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments