गोंदिया : उन्हाच्या तप्त झळांनी नागरिकांची लाही लाही होत असताना छोट्या पक्ष्यांच्या होणार्या अवस्थेचा विचार केला तरी मन सुन्न होऊ शकते. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागु नये, यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने स्थानिक गजानन कॉलनी येथे पक्ष्यांसाठी कृत्रिम जलकुंडाची सोय करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे पर्यावरण सल्लागार अरूण बाबुलाल पारधी व जिल्हाध्यक्ष मदनगोपाल नंदनवार यांनी गजानन कॉलनी येथे मातीचे भांडी वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती होवू नये याकरीता घराच्या छतावर, दर्शनी भागात मातीच्या भांड्यात पाण्याची सोय करावी, असे आवाहन केले.
पक्ष्यांसाठी पाण्याची सोय
RELATED ARTICLES