असोली येथील प्रकार
गोंदिया : मागच्या तीन वर्षापासून गोंदिया तालुक्यातील आसोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने सदर दवाखाना वाऱ्यावर पडला की काय? असा प्रश्न परिसरातील पशुपालकांना पडला आहे.परिणामी आपल्या जनावरांचा उपचार खाजगी डॉक्टर कडून करावा लागत असून त्यासाठी शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे
आसोली येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून या अंतर्गत परिसरातील नवरगाव(कला),दतोरा, मोरवाही,नवरगाव(खुर्द), मुंडीपार(खुर्द)वाटाणा,इरी, तसेच आसोली ही गावे समाविष्ट आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांकडे मोठया प्रमाणत जनावरे आहेत.त्यांच्या जनावरांच्या उपचारांसाठी हा एकमेव दवाखाना आहे. परंतु मागच्या तीन वर्षापासुन या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नाही.परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचा उपचार खाजगी डॉक्टर कडून करावे लागत आहे. त्यासाठी त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मध्यंतरी या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसले तरी येथील परिचर हा दवाखाना सांभाळीत येणाऱ्या पशु वर प्रथमोपचार करून औषधी पुरवीत होता.त्यामूळे डॉक्टर उपलब नसले तरी जनावरांचा उपचार होत होता.त्यामुळें शेतकऱ्याना अडचण होत नव्हती.परंतु त्या परीचाराचेही स्तानतरण आकसापोटी आरोग्य विभागात करण्यात आले त्यामुळे सदर दवाखाना कर्मचारी अभावी उघडे पडले आहे.
जनावरांचे संगोपन करून त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून पशु वैद्यकीय दवाखान्याची सुरुवात करण्यात आली परंतु या दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. या गावाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असा मोठा राजकीय वारसा लाभूनही या गावातील पशु वैद्यकीय दवाखान्यांची स्थिती लाजिरवाणी झाली आहे. मध्यंतरी एका साथीच्या रोगाने जनावरांना सडो की पडो करून सोडले. त्यात मोठ्या प्रमाणात परिसरातील जनावरे दगावली असल्याची बोलले जात आहे.सदर दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाहीं, परंतु परीचाराला तरी ऊपलब्ध राहु दया जेणेकरून जनावरांचे प्रार्थमिक उपचार तरी करता येईल अशी मागणी परिसरातील शेतऱ्यांकडून होत आहे.
प्रतिक्रीया-
माझ्या कडे आसोली, अदासी, कामठा, व अर्जुनी मोरगाव येथीलअतिरिक्त प्रभार आहे. त्यामूळे मी कुठल्या ही ठिकाणी ऊपलब्ध राहु शकतो. तरीपणआलेल्या वेळेवर सेवा देण्याचा माझा प्रयत्न असतो.
विशाल आडे, पशु वैद्यकीय अधिकारी अदासी