दोषींवर कारवाईची केली मागणी
ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव डॉक्टरांचा हलगर्जीपणा
गोंदिया : अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात (ता १३) प्रस्तुती केलेल्या महिलांची काळजीपूर्वक हाताळणी न केल्यामुळे सर्व प्रसूती झालेल्या महिला रुग्णांचे टाके उघडे पडले यामुळे दोन महिला रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना कुवर तीलकसिंह रुग्णालय गोंदिया येथे स्थलांतर करण्यात आले असून दोन रुग्ण १३ दिवसांपासून अजूनही उपचार घेत आहेत रुग्णांच्या नातेवाईकांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामीण रुग्णालय अर्जुन मोरगाव येथे (ता.१२) रोजी भरती केलेल्या ४ महिलांची प्रसुती शस्त्रक्रिया दि.१३ जुलैला करण्यात आली.ग्रामीण रुग्णालयातील झालेली हेळसांड रुग्ण महिलांच्या जीवावर बेतण्याची चिन्ह दिसत आहे इतका मोठा हलगर्जीपणा डॉक्टरांनी केल्यानंतरही कुठलीही काळजी घेताना रुग्णालय प्रशासन दिसत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ४ महिलांची प्रसुती शस्त्रक्रिया डॉ.पल्लवी नाफडे यांच्याकडून करण्यात आली त्यात, सौ.शीतल कुंभरे जांभळी, सौ भैरवी शहारे पवणी/धाबे , सौ कंचन कीर्तीनिया गौरनगर, सौ पूजा रामटेके झरपडा या महिला रुग्णाची प्रसूती शस्त्रक्रिया झालेल्या चारही महिला रुग्णांचे टाके उघडे पडले आहेत यापैकी कंचन कीर्तीनिया गौरनगर,पूजा रामटेके झरपडा या रुग्ण महिलांचे टाके मोठ्या प्रमाणात उघडे पडल्याने धोका दिसताच जबाबदारी झटकून गोंदिया येथील कुवर तीलकसिंह रुग्णालय गोंदिया येथे स्थलांतर करण्यात आले. तर सौ.शीतल कुंभरे जांभळी, सौ भैरवी शहारे पवणी/धाबे यांच्यावर अजूनही १३ दिवसांपासून उपचार सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रसूती करताना नेहमीच हलगर्जीपणा केला जातो. टाके देणे व इतर गोष्टी स्वत : तज्ञांनी करणे गरजेचे आहे मात्र अधिपरिचारिका अथवा इतर कर्मचाऱ्यावर सोडून डॉक्टर लगेच बाहेर पडतात. त्यामुळे झालेला प्रकार रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे यावर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक लोकेश वाढीवा यांचेशी संपर्क होऊ सकला नाही. त्यांचा कुठलाही दिवस ठरलेला नाही रुग्णांना भरती ते संदर्भसेवा देताना प्रत्येक बाबी काळजी पूर्वक नोंद बाळगणे गरजेचे आहे त्यासाठी रुग्ण निहाय आटोटोक्लो नोंदवही,उपलब्ध दिसून आली नाही. प्रसुती शस्त्रक्रिया करताना सर्व रुग्णांना वापरण्यात आलेले साहित्यबाबत शंका व्यक्त होत आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांनी अधीक्षक उपस्थित नसल्याचे कारण सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.
यामुळे तर संसर्ग नाही ना ?
झालेला हा संसर्ग अतिशय धोकादायक आहे. रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रिया गृह स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची निर्जंतुकीकरण.तसेच शस्त्रक्रिया करताना बीटाडिन व इतर आवश्यक साहित्यांचा वापर करणे गरजेचे आहे.प्रसूती झाल्यानंतरही अँटिबायोटिक औषधी, ड्रेसिंग अथवा इतर गोष्टी काळजीपूर्वक हाताळणे अत्यंत गरजेचे आहे.मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे संसर्ग वाढला रुग्णालयाची हेळसांड रुग्णांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे दिसून येत आहे.