Thursday, December 5, 2024
Google search engine
HomeUncategorizedमहिला जि.प. सदस्याचे अन्नत्याग आंदोलनाची तिसर्या दिवशी सांगता

महिला जि.प. सदस्याचे अन्नत्याग आंदोलनाची तिसर्या दिवशी सांगता

गोंदिया. आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील रस्त्याच्या बांधकामाला घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाल स्मरणपत्र आणि अल्टिमेटम देवून देखील ती कामे न झाल्याने अखेर कंटाळून जिल्हा परिषद सदस्य विमल बबलू कटरे यानी महिला पंचायत समिती सदस्यासह जिल्हापरिषदेसमोर 19 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्याला आपल्या मतदारसंंघातील कामाकरीता अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आली. या आंदोलनाची अखेेर जिल्हा परिषद प्रशासनाला दखल घ्यावी लागली असून तिसर्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर,जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्यासह बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी आंदोलन मंडप गाठले. आंदोलनकर्ते जि.प.सदस्या विमल कटरे व पंचायत समिती सदस्या सौ.फुंडे यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या मागण्यासंबधीचे कामाचे पत्र तयार असल्याचे सांगून माजी आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बनसोड, जि.प.विरोधी पक्ष गटनेता संदिप भाटिया,माजी जि.प.अध्यक्ष सौ.उषा मेंढे व जि.प.सदस्याच्या उपस्थितीत निंबू पाणी पाजूून आंदोलन सोडवले. सालेकसा तालुका नक्षलग्रस्त, मागासलेला आणि आदिवासीबहूल आहे. तिरखेडी क्षेत्रात येणाऱ्या साखरीटोला ते तिरखेडी या रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले. या रस्त्याच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी अनेक आंदोलने झाली. किमान खड्डे भरण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेने कार्यारंभ आदेश द्यावा. धानोली ते बाम्हणी रस्ता बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र देवून देखील रस्ता बांधकाम झाले नाही. त्या रस्ता बांधकामाला निधी वाढवून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेला विमल कटरे यांनी दिले होते. 18 सप्टेंबरपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास 19 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार हे आंदोलन 19 सप्टेंबरपासून सुरु करण्यात आले होते.
विशेष म्हणजे यासंंदर्भात एकदिवसापुर्वी जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषदेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून आंदोलनकर्ते हे आंदोलनजिवी असल्याचे म्हटले होते.तसेच आपण रस्ताचे भूमिपूजन करणार मात्र अन्नत्याग आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषण सोडवण्याकरीता पुढाकार घेणार नसल्याचे म्हटले होते.परंतु ज्या पत्राच्या अनुषंगाने जि.प.पदाधिकारी बोलत होते,त्याच पत्रावर आंदोलनकर्त्या जिि.प.सदस्यांनी चूक शोधत जिल्हा परिषद प्रशासनाची पोल खोल केल्याने अखेल जिल्हा परिषद प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments