Tuesday, September 17, 2024
Google search engine
HomeUncategorizedम्हसगावच्या मनीषने ONGC च्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रत पहिला क्रमांक पटकावला

म्हसगावच्या मनीषने ONGC च्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रत पहिला क्रमांक पटकावला

गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील शेतकरी कुटूबांत जन्माला आलेल्या व सध्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील अलाय एण़़्ड स्टिल कंपनीत कनिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ पदावर कार्यरत मनिष हेतराम बोपचे यांना Geology (भूगर्भ शास्त्र)विषयासाठी भारत सरकारच्या ONGC(Oil and Natural Gas Company) कडून सन 2021-22 या वर्षासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे. मनीषने जियोलॉजी(भूगर्भ शास्त्र) विषयात भारतातून नवव्या स्थानावर तर महाराष्ट्रातून पहिल्या स्थान पटकावला आहे. मनिषचे प्राथमिक शिक्षण म्हसगांव येथील जिल्हा परिषद शाळेत पुर्ण झाले.त्यानंतर शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगांव येथे 12 वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.महात्मा गांधी वरिष्ठ महाविद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथून भूगर्भ शास्त्र या विषयात 80 %टक्के गुण घेवून पदवी (बी.एससी)उत्तीर्ण केली.तर संत गाडगेबाबा महाराज विद्यापीठ, अमरावती येथून पदवूत्तर (एम.एस्सी.) अभ्यासक्रम पुर्ण केला.मनिषने आपल्या यशाचे श्रेय आई वडील,आजोबा व आपल्या शिक्षकांना दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितिवर मात करूनआपल्या जिद्द, चिकाटी व मेहनती मुळे हे यश प्राप्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments