गोंदिया : सोमवारला शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सर्व शिक्षकांना व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ६ व्या व ७ वेतन आयोगानुसार दरमहा १५०० रु प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा.जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घरभाडे थकबाकी सह देण्यात यावे.माननिय सु.द.आंबेकर अप्पर सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक ०१ मार्च २०२३ अन्वये एकस्तर पदोन्नतीचा चा लाभ जिल्हा नक्षलग्रस्त असेपर्यंत देय आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांनी केलेले आहे त्याच धर्तीवर गोंदिया जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ द्यावा.अशा प्रकारच्या मागण्यांसह निवेदन देण्यात आले.
यावेळी लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर, जिल्हा संघटक उमेंद्र मानकर, सरचिटणीस सौरभ अग्रवाल, कार्याध्यक्ष पी.जी.शहारे, नंदलाल कावळे,सहसंघटक प्रकाश रहांगडाले, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, चतुर्थ श्रेणी कर्मचारी अध्यक्ष भगीरथ नेवारे तथा सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.