Saturday, June 22, 2024
Google search engine
HomeUncategorizedलोकसभेची जागा आमच्या हक्काची आम्ही सोडली गैरसमज नको : खा. प्रफुल्ल पटेल

लोकसभेची जागा आमच्या हक्काची आम्ही सोडली गैरसमज नको : खा. प्रफुल्ल पटेल

गोंदिया : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्या हक्काची असून ही जागा राष्ट्रवादीने अद्याप सोडलेला नाही.त्यामुळे आम्ही निवडणुक लढणार नाही असे कुणीही गृहीत धरु नये अशी रोखटोक भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफल पटेल यांनी केेले. ते गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे आयोजित गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात आज बोलत होते़.सोबतच पटेलानी गोंदिया व भंडारा येथील अपक्ष आमदार आमच्या राष्ट्रवादीमुळे निवडून आले.पण ते आज इकडून तिकडे फिरत आहेत त्यानाही वेळेवर जागा दाखवण्याची वेळ येणार आहे असे सांगतानाच भेल प्रकल्प २०१४मध्ये जे निवडून लोकसभेत गेले त्यांनी वाट लावली.ते नेते आपल्या तालुक्याचा विकास करु शकले नाही ते आम्हाला काय सांगणार असे म्हणताच आमदारानो तुमची कुंडली माझ्याकडे आहे.इतरांचीही कुंडली माझ्या हातात आहे हे विसरू नका मी तुम्हाला मागे पडू देणार नाही.मात्र विकासाकरीता मोदींजेंचे हात बळकट करण्यासाटी व विकासाच्या मुद्यावर काम करण्याकरीता महायुतीत गेलो.जिल्ह्यात कॉंग्रेस फक्त टिव्हीवर असून विधानसभेत फक्त दोन जागेवर समाधान मानून चालणार नाही अजितदादा हे तुम्हाला आजच सांगतो़. सर्वेत प्रफुल पटेलांचा नाव प्रथम क्रमाकांवर आहे हे भाजपनेही विसरून चालणार नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments