दोन दिवसीय या सांस्कृतिक संमेलनात विद्यार्थ्यांनी अनेक रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत केले
गोंदिया: देवरी येथील ताराम आदिवासी शिक्षण संस्थे द्वारे संचालीत स्व.चंद्रकला ताराम आदिवासी आश्रमशाळा शेरपार येथे वार्षिक स्नेहसम्मेनाचे यशस्वी आयोजन गुरूवारपासून करण्यात आले होते. दरम्यान दोन दिवसीय सांस्कृतिक संमेलनात विद्यार्थ्यांनी अनेक रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत केले.
या स्नेहसम्मेलनाचे उद्घाटन शेरपारचे सरपंच गुणवंताबाई कवास यांच्या हस्ते आणि ताराम आदिवासी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अर्चनाताई ताराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी ताराम आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव तथा आदिवासी नेता रमेश ताराम, संस्थेचे कार्यकारणी सदस्य रामेश्वर कुमोटे, सदस्य हरिभाऊ ताराम, शेरपार चे उपसरपंच मेहनलाल ओटी,पोलीस पाटील लालश्याम गावळकर,माजी सरपंच सर्वानंद कवास, ग्रा.पं.सदस्य माखनलाल नेताम,शाळेच्या प्राथमीक विभागाचे मुख्यध्यापक एन.एस.गि-हेपुजे ,
माध्यमीक विभागाचे मुख्यध्यापक जे.एन.लंजे यांच्यासह सेरपार परिसरातीलपालकवर्ग गावकरी,शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रमेश ताराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी म्हटले की, पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षणाची गोडी लावावी तसेच त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे म्हटले. तर कार्यक्रमाचेअध्यक्ष अर्चनाताई ताराम यांनी प्रत्येक विद्यार्थ्यात सुप्त गुण दडलेले असतात. अंगात असलेल्या सुप्त गुणांची ओळख झाली पाहिजे, त्या दिशेने वाटचाल केल्यास सर्वांगीण प्रगती होते. गुणांची ओळख पटविण्यासाठी शालेय जीवनात व्यासपीठ म्हणून स्नेहसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम असी माध्यमे असतात असे विचार व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्तावीक आश्रमशाळेचे अधिक्षक टि.के हातझाडे यांनी तर संचालन सहाय्यक शिक्षक भोजराज फुंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक श्री वंजारी यांनी मानले.
दरम्यान दोन दिवसीय सांस्कृतिक संमेलनात विद्यार्थ्यांनी अनेक रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत केले.
या स्नेहसम्मेलनात पालक मेळावा व बक्षिस वितरण शेरपारचे माजी सरपंच नारायण ताराम यांच्या हस्ते आणि शाळा संस्थेचे अध्यक्ष अर्चनाताई ताराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.या प्रसंगी शेरपारचे सरपंच गुणवंताबाई कवास,पोलीस पाटील लालश्याम गावळकर,डॉ. उमेश ताराम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक भोजराज फुंडे यांनी तर संचालन सहाय्यक शिक्षक वाय.जी.मेश्राम यांनी केले. आणि उपस्थितांचे आभार मुख्यध्यापक एन.एस.गि-हेपुंजे यांनी मानले.