गोंदिया : राष्ट्रीय सिकल सेल अनेमिया निर्मूलन अभियान अंतर्गत स्थनीक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात 1 जानेवारी रोजी मोफत रोगनिदान शिबीर व सिकल स्क्रिनिंग व कार्ड वाटप अभियान चे आयोजन करण्यात आले होते.
या मोफत शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख मार्गदर्शिका म्हणून रक्त संक्रमण तज्ञा डॉ सुवर्णा हुबेकर प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन उईके प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिनेश सुतार जिल्हा आरोग्य माहिती अधिकारी श्री प्रशांत खरात सिकल सेल समनवयिका सपना खंडाईत आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते सिकल पोर्टल चे लोकार्पण करून या सिकल मुक्त भारत अभियानाचा 1 जुलै रोजी ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला त्या निमित्ताने पूर्व विदेर्भातील सिकल ग्रस्त गोंदिया जिल्यात देखील जिल्हा स्तरावर बाई गंगाबाई
महिला व बाल रुग्णालयात
मोफत सिकल सेल स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले सिकल मुक्त गोंदिया चा संकल्प घ्या प्रत्येकाने आपले सिकल स्टेटस तपासून घ्या
पालकांनो आपल्या मुलां मुलींचे लग्न जुळवताना लग्न
कुंडली तपासनण्यापेक्षा आरोग्य कुंडली तपासूनच लग्न जुळवा. तरच आपण सिकल सेल या आजारचे उच्चाटन करू शकू .या वेळी गर्भवती महिलांना सिकलसेल आजरा बाबत जेनेटिक काऊनसेलिंग डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केली
सिकल सेल रुग्णा ना बाई गंगाबाई महिला रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले
या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन उइके यांनी सिकल बालंकाची घ्यावयाची काळजी या बाबत शास्त्रोक्त माहीती दिली जिल्हा आरोग्य माहिती अधिकारी श्री प्रशांत खरात यांच्या शुभ हस्ते सिकल सेल आजार माहिती पत्रकांचे रुग्ण व नातेवाईक यांना वाटप करण्यात आले शासकीय परिचर्या महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचरिकांचे सिकल स्टेटस तपासणी करण्यात आली 43 गर्भवती महिला व 23 बालकांची मोफत आरोग्य तपासणी व सिकल स्क्रिनिंग करण्यात आली. सिकल मिशनचा हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्री संतोष नायकाने खगेंद्र शिवरकर व भाग्यश्री यांनी सहकार्य केले.