गोंदिया : भारतीय स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम दि. 9 ते दिनांक 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्याच्या सुचना शासनाने निर्गमित केल्या आहे.त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र,आरोग्यवर्धिनी उपकेंद्र,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र,आपला दवाखाना,आयुवेर्दीक दवाखाने येथे मार्गदर्शक सुचनाचे पालन करुन “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. “हर घर तिरंगा” साठी आरोग्य संस्था सरसावल्या असुन सर्व आरोग्य संस्थेत ध्वजारोहण करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असुन तिरंगा प्रतिज्ञेतुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अभियानात राबविण्यात येणाऱ्या प्रमुख बाबी तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम,तिरंगा कॅन्वास,तिरंगा प्रतिज्ञा,तिरंगा सेल्फी,तिरंगा ट्रिब्युट,तिरंगा मेळावा असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
“हर घर तिरंगा” साठी आरोग्य संस्था सरसावल्या
RELATED ARTICLES