Friday, July 26, 2024
Google search engine
HomeUncategorizedही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची : देवेंद्र फडणवीस

ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची : देवेंद्र फडणवीस

तिरोडा येथे जाहिर सभा

गोंदिया : या लोकसभा निवडणूकीत दोनच पर्याय आहेत. एक मोदीजींच्या नेतृत्वात असलेले एन.डी.ए., महायुतीचे सक्षम नेतृत्व असलेले इंजन तर दुसरीकडे विरोधकांकडे नेतृत्वहीन व बोगी नसलेले इंजन आहे. त्यातील प्रत्येक पक्ष स्वत:ला व कुटुंबीयांना इंजन समजतो तर मोदीजी सर्वांना सोबत घेवून विकासाकडे वाटचाल करीत आहेत. मागील दहा वर्षात देशात जे विकासकार्य झालेले आहेत, त्यांना पुढे घेवून जाण्याकरिता मोदीजीचे नेतृत्व आवश्यक आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची असल्याने या लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते आज १५ एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ तिरोडा येथील जि.प.कन्या शाळेच्या प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, आ.विजय रहांगडाले, भाजप जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य, राजेंद्र जैन, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, विरेंद्र अंजनकर, सोनाली देशपांडे, योगेंद्र भगत, प्रेम रहांगडाले, ओम कटरे, तुमेश्वरी बघेले, भाऊदास कठाणे, माधुरी रहांगडाले, चर्तुभुज बिसेन, सुनिल पालांदुरकर, आशिष बारेवार, पवन पटले, स्वानंद पारधी, ममता बैस आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू करून जन सामान्यांचा जिवनमान उंचावण्याचा काम केला आहे. आज २५ कोटी जनतेला गरीबीरेषेतून वर नेले आहे. आवास योजना, स्वच्छता व शौचालय, उज्वला योजनेतून गॅस कनेक्शन, पिण्याचे शुध्द पाणी, वृध्द, दिव्यांग, युवा, बेरोजगार, महिला यांच्यासाठी मोठी कामे कली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रूपये व आपल्या धान उत्पादक शेतकºयांना २० हजार रूपये बोनसचे प्रती हेक्टरी दिले जात आहे. आता मुद्रा योजनेचे लोन मर्यादा १० लाखावरून २० लाख करणार, ८० कोटी जनतेला मोफत रेशन दिले जात आहेत. सुर्यघर योजनेतून तीनशे युनिट वीज मिळणार आहे. देशाची अर्थव्यवस्था तीसºया क्रमांकावर आणणार असून यातून प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक बाबतीत विकास होईल, असेही ते म्हणाले. तिरोडा येथील धापेवाडा प्रकल्पाबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, मी जलपुजन व भुमिपूजनाकरीता जुन मध्ये परत तिरोड्याला येणार आहे. धापेवाडा टप्पा दोनची सुप्रमा देण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले की, सुनिल मेंढे यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी खुप कामे केलेली आहेत. त्यांनी संसदेत २५३ प्रश्न लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी व क्षेत्राच्या विकासासाठी मांडले होते. ते क्षेत्रासाठी तळमळीने काम करणारे असून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना निवडून पाठविण्याचे आवाहन केले. सोबतच येथील आमदार विजय रहांगडाले हे पहिल्या २५ उत्कृष्ट आमदारांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमेदवार सुनिल मेंढे, विजय रहांगडाले, राजेंद्र जैन, हेमंत पटले आदिंनी सभेला मार्गदर्शन केले. सभेचे संचालन मदन पटले व अविनाश जायस्वाल यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments