जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अन्नभिन्न
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात येरंडी/ देवलगाव गावात एक जीबीएस चा संशयीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 14 वर्षीय मुलगा या आजाराच्या विळख्यात सापडला आहे. त्याचे वर नागपूर येथील एम्स रुग्णालयात मुलांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असून तो गेल्या 18 दिवसापासून व्हेंटिलिटरवर आहे. मात्र या आजाराबद्दल जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अन्नभिन्न असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुलियन बेरी सिंड्रोम ( जीबीएस ) या आजाराने डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्यात शेकडो रुग्ण बाधित असल्याची माहिती आहे. याचे लोन आता गोंदिया जिल्ह्यातही पोहोचले आहे. अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी स्नायूवर हल्ला करत असल्याने हातापायावरील ताकद जाऊन अंगलुळे पडण्याची लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी/ देव. येथील 14 वर्षीय मुलगा अर्जुनी मोर येथील जीएमबी विद्यालय येथे आठव्या वर्गात शिकत आहे. त्याची प्रकृती 17 जानेवारी 2025 ला अचानक बिघडली. लगेच सदर मुलाला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे 18 जानेवारीला दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच दिवशी सांय. सहा वाजता गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेही प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच दिवशी रात्री एक वाजता नागपूरला हलविण्यात आले. एका खाजगी दवाखान्यात भरती केल्यानंतर तिथे एम आर वगैरे काढण्यात आले. व यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर रक्त तपासणी नसाचे स्कॅनिंग कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन तपासणी केली असता सदर मुलाला जीबीएस चे लक्षण दिसून आल्याचे समजते. त्यामुळे एम्स रुग्णालयातील मुलांच्या अतिदक्षता विभाग मध्ये भरती करण्यात आले. गेल्या 18 दिवसापासून एम्स रुग्णालयात सदर मुलाला व्हेंटिलेटर वर ठेवून उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सदर मुलाच्या आजाराविषयी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोर.येथुन माहीती मिळाली असुन सदर मुलाला गिळण्याचा त्रास व श्वासाचा त्रास,तसेच दोन्ही पायात हालचाल नव्हती.त्यामुळे गोंदिया केटिएस ला हलविण्यात आले. तिथुन .सदर मुलाला नागपुर एम्स मधे दाखल केले. त्याला जीबीएस ची लागन झाल्याची अधिकृत माहीती प्राप्त झाली नाही.जिल्हा आरोग्य विभाग एम्स रुग्णालयाचे संपर्कात असुन अधिकृत माहीती आल्याबरोबर सदर गावाचे तातडीने सर्व्ह करुन ग्रामवासियांची तपासण्या करु,जीबीएस हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरीकांनी घाबरु नये.
– डाॅ. सुकन्या कांबळे तालुका वैद्यकीय अधिकारी अर्जुनी-मोरगाव






