Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedचार गांजा तस्करांना केले जेरबंद, 2 लाख 53 हजारांचा मुद्दमाल जप्त 

चार गांजा तस्करांना केले जेरबंद, 2 लाख 53 हजारांचा मुद्दमाल जप्त 

गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनाची धाड कारवाई

गोंदिया : पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध प्रभावी धाड कारवाई करण्याचे निर्देश सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हास्तरावर एन.डी. पी. एस. कायद्यान्वये कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून 6/03/2025 रोजी वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी, साठा, वापर, विक्री व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोहीम छेडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच पो. ठाणे डुग्गीपार येथील पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध धाड कारवाई करून चौघांना जेरबंद केले आहे. आरोपी नामे मोहनलाल साधुजी बघेले, वय 50 वर्षे, रा. सितेपार, ता. आमगाव, कार्तिक शिवेंद्र कवरे वय 20 वर्ष रा. डुण्डा ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया, आदित्य ब्रम्हानंद धनविजय वय 22 वर्ष रा. खैरीदिवान ता. पवनी जि.भंडारा, विनय खुशाल बारापात्रे वय 21 वर्ष रा. आंधळगांव ता. मोहाडी जि. भंडारा अशी अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) बाळगणाऱ्याची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने* सापळा रचून *आरोपी नामे मोहनलाल साधुजी बघेले रा. सीतेपार* यास त्याचे राहते घरी सीतेपार येथे धाड कारवाई करून त्याचे घरझडतीत ताब्यातून विक्री करीता साठवून ठेवलेला 6 किलो 886 ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती 1 लक्ष 37 हजार 720/- रुपये चा जप्त करण्यात आले असून पोलीस ठाणे आमगाव येथे NDPS कायद्याचे कलम 8(क), 20, 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तसेच पोलीस ठाणे डुग्गीपार पोलीस पथकाने आरोपी नामे कार्तिक शिवेंद्र कवरे रा. डुण्डा ता. सडक अर्जुनी, आदित्य ब्रम्हानंद धनविजय रा. खैरीदिवान ता. पवनी जि.भंडारा, विनय खुशाल बारापात्रे रा. आंधळगांव ता. मोहाडी जि. भंडारा यांना दुंडा पांढरी फाट्यावर वाहतूक करतांना संशयावरून सापळा रचून कारवाई करण्यात आली असता त्यांचे ताब्यातून अवैधरित्या 2 किलो 981 ग्रॅम ओलसर, पाने, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती 59,620/- रुपये, एक मोटर सायकल किंमती 50 हजार, व ईतर साहित्य मोबाईल हँडसेट, दोन कॉलेज बॅग किं. 5700/- असा एकुण 01 लक्ष 15 हजार 320/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद तिन्ही आरोपी यांचे विरुद्ध पो ठाणे डुग्गीपार येथे NDPS कायद्याचे कलम 8(क),20,29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.  सदरची धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे दिशा निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.उप. नि. शरद सैदाने, अंमलदार राजू मिश्रा, भुवन देशमुख, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश पाटील, राम खंदारे यांनी तसेच पोलीस ठाणे डुग्गीपार चे पो. नि. श्री. मंगेश काळे यांचे नेतृत्वात मार्गदर्शनात सपोनी बांबोळे, पोलीस अंमलदार- अग्निहोत्री, जगदीश मेश्राम, रणजीत भंडारकर, हरिणखेडे, इंगळे, खोब्रागडे यांनी कारवाई केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments