Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला दिनानिमित्त गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने न.प.मधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

महिला दिनानिमित्त गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने न.प.मधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

गोंदिया : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषद सभागृह, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष श्री नानू मुदलियार, नगर परिषद मुख्याधिकारी श्री संदीप छिद्र्वार, डीसिओ श्री चुन्नीलाल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया नगर परिषद मध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून महिला दिवस साजरा करण्यात आला.

गोंदिया नगर परिषद मध्ये कार्यरत कर्तव्यनिष्ठ महिला कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तिपत्रक देवून सत्कार तसेच श्री शिव मंदिर विवेकानंद कॉलोनी येथील महिला भजन मंडळाला हार्मोनियम, तबला व अन्य सामग्रीचे वितरण माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नानू मुदलियार, संदीप छिद्र्वार, चुन्नीलाल राणे, सविता नानू मुदलियार, कुंदा वेनेश्वर पंचबुद्धे, मालती राजेश कापसे, हर्षा बन्सोड, मनीष बेनिसाल, सुनंदा बिसेन, माधुरी खोब्रागडे, राजेश दवे, नागो बंसोड, तुषार उके, श्रेयस खोब्रागडे, अविनाश महावत, लव माटे, मगेश रंगारी, कुंदा गौतम, तारा बावनथडे, प्रीती पटले, प्रीती मेश्राम, सुमन भोयर, प्रेमलाल मेश्राम, रमेशलाल मेश्राम यांचा सह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता, नगर परिषदचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री राजेश दवे तर आभार श्री खुशाल कटरे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments