चोरी गेलेले मोबाईल देवरी पोलिसांनी मुळ मालकास केले परत

0
183

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, नित्यानंद झा साहेब, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कँम्प देवरी, विवेक पाटील साहेब,उपविभागिय पोलीस अधिकारी देवरी, यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरिक्षक देवरी यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे देवरी हद्दीतील हरविलेले मोबाईल शोध संबंधाने CEIR प्रणालीचा वापर करुन 13 मोबाईल ज्यात, वनप्लस,विवो, सँमसंग, रियलमी, ओप्पो, रेडमी, मोटोरोला हे मोबाईलचा शोध देवरी पोलीसाद्वारे घेण्यात आले होते. 3 जानेवारी 2025 रोजी देवरी पोलीसांनी शोध घेतलेले विविध कंपनीचे 13 मौल्यवान मोबाईल पोलीस रायझिंग डे च्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, यांचे हस्ते अर्जदारांना (मालकांना) परत करण्यात आले. अर्जदारांनी मोबाईल शोधुन मिळाल्याने गोंदिया पोलीस दल व देवरी पोलीसांचे आभार मानले आहे. सदर मोबाईल शोध पो.शि. गोपालप्रसाद पांडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here