जुन्या रामनगर पोलिस ठाण्यात लागली आग, दोन कार जळून खाक

0
402

गोंदिया : गोंदिया शहरातील जुन्या रामनगर पोलिस ठाण्यात 24 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजताच्या सुमरास भिषण आग लागली, आगीत जप्त केलेले दोन कार जळून खाक झाल्या असून पोलिस ठाणा हा नवीन इमारतीत स्थानांतर केल्यामुळे रिकाम्या इमारतीला ही आग लागली.

त्यामुळे कुठलेही शासकीय दस्तावेजाचे नुकसान झाले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली असून अग्नीशमन विभागाचे दोन वाहन घटनस्थळी दाखल करीत आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here