गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने तुडुंब भरलेल्या बाराभाटी येथील तलावाची पार फुटल्याने तलावाखालील क्षेत्रात रोवणी झालेले पीक नष्ट झाले.त्यातच तलावातील पाणी सुध्दा पुर्णःता रिकामे झाल्याने येणाऱ्या दिवसात सिंचनाचा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित राहणार ही माहिती मिळताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी 25 जुलै रोजी बाराभाटी येथील फुटलेल्या तलावावर जाऊन पाहणी केली.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.
तालुक्यातील बाराभाटी येथे गावाला लागूनच गाव तलाव आहे. 28 एकर जागेत तलाव विस्तारलेला आहे.तलावाच्या पाण्याने तलावाखालील अंदाजे 150 एकर शेतीला सिंचनाची सोय होते. मात्र ऐन पावसात तलावाची पाळ फुटल्याने पाळीच्या खालील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर येणाऱ्या दिवसात सिंचन करण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. याबाबत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना भ्रमणध्वनीद्वारे नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राऊत यांचेसी चर्चा करून तलाव दुरुस्ती करण्यासंदर्भात बाराभाटी ग्रामपंचायत व संबंधित शेतकरी यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही केल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, महामंत्री लैलेश शिवणकर, पंचायत समिती सदस्य शालिनी डोंगरवार, सरपंच सरस्वता चाकाटे, उपसरपंच किशोर बेलखोडे ,आदिवासी विकास सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुलाराम मारगाये, नरेश खोब्रागडे, वनिता नसीने, खरेदी विक्रीचे संचालक विलास बनसोड, तेजराम डोंगरवार, मोरेश्वर सौंदरकर व शेतकरी तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . हे खाजगी शेतकऱ्यांचे तलाव असल्याने मग्रारोहयो मधूनही दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना माजी मंत्री बडोले यांनी दिल्या आहेत.
तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान-माजी मंत्री बडोलेंनी केली पाहणी
RELATED ARTICLES






