पाणीसाठे हटवा….,भंगार फेकुन द्या… एक दिवस कोरडा दिवस पाळा; साथींच्या आजारापासुन दुर रहा : एम.मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी

0
201

गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.पावसाळ्यात हिवताप, डेंग्यु, मेंदुज्वर सारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो.वरील सर्व आजार डासांपासून होत असतात.त्यामुळे किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी नागरिकांना केले आहे.तसेच त्याचबरोबर हिवताप,डेंग्यु, मेंदुज्वर सारख्या किटकजन्य आजारांची साथ नियत्रंणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी जून व जुलै महिन्यात हिवताप/डेंग्यु प्रतिरोध महिना राबविण्यात येत असतो.संपुर्ण पावसाळ्यात किटकजन्य आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली तर निश्चीतच आपण हिवताप,डेंग्यु, मेंदुज्वर सारख्या किटकजन्य आजारांची साथ रोखु शकतो असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी माहीती दिली आहे.या अभियानांतर्गत आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी केली जातात.ही भांडी घासून पुसून कोरडी केली जातात आणि घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावे.यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी सांगितले.
दरवर्षी जूलै व सद्य ऑगस्ट महिन्यात पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे. यामुळे डासांना पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे.या डासांमुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उदभवत असतात. या जलजन्य आणि किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपापले घर आणि घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे, किटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे.डेंगी व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास हे घरातील मनिप्लांट, फुलदाणी, कुंडी,फ्रिज, कुलर, जमिनीतील पाण्याची टाकी, प्लास्टिकच्या टाक्या, घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर, ट्युब,नारळाच्या करंवटे, प्लास्टिकच्या बॉटल्स, तुटलेले कप व भंगार सामान यांची विल्हेवाट लावण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील कोणत्याही गावात किंवा वाडी-वस्तीवर साथीचे रोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता आरोग्य विभागाच्यावतीने आतापासूनच घेण्यात येत आहे. यासाठी गावा-गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, हातपंप, हॉटेल, टँकरची स्वच्छता नियमितपणे केली जावे. शिवाय पाण्याचे शुद्धीकरण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, धूरफवारणी करणे आदी उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत नियमित करण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here