Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedबदलत्या समीकरणात आमदार कोरेटेंची अग्निपरीक्षा

बदलत्या समीकरणात आमदार कोरेटेंची अग्निपरीक्षा

विद्यमान आमदार कोरोटे यांच्यासाठी आकडेमोड महत्त्वाची असणार
गोंदिया : अनुसूचित जमातीकरीता राखीव असलेल्या देवरी-आमगाव विधानसभा – मतदारसंघाचा समावेश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात होतो. आपल्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावी, त्याचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत व्हावा, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान आमदार सहषराम कोरेटे यांनी प्रचार, जनसंपर्क, पक्षबांधणी केली. राजकारणाच्या बदलत्या समीकरणात त्यांची ही अग्निपरीक्षाच होती. लोकसभेच्या निवडणूकीत मिळालेल्या यशावरून आता त्यांची खरी ताकद कळली आहे.
आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघ परिसीमनानंतर देवरी, सालेकसा आणि आमगाव या तीन तालुक्यांचा समावेश करीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला. हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. परिसीमनानंतर या मतदारसंघाने तीन आमदार दिले. त्यात एक भाजप संजय पुराम आणि दोनदा म्हणजे रामरतन राऊत व सहषराम कोरोटे या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे. सद्यस्थितीत सहषराम कोरेटे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे सहषराम कोरेटे यांनी भाजपचे संजय पुराम यांना पराभूत करीत ८८ हजार २६५ मते घेऊन विजयी झाले. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली. त्या निवडणुकीत स्वतःचे जनमत शाबूत ठेवण्यासाठी सहषराम कोरेटे यांनी काँग्रेसचे लोकसभाचे उमे‌द्वार नामदेव किरसान यांना आपल्या मतदारसंघातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले. तीनही तालुक्यांत प्रचाराचा धुराळा उडाला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी किती ताकद लावली, त्याचा फायदाही झाला.
त्याच मतांच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीत कुठे, किती मते कमी आणि जास्त पडली, याची समीक्षादेखील करता येणार आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात फेरबदल होण्याची शक्यता. निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. अशाही स्थितीत आकलनामुळे हुरळून न जाता जमिनीस्तरावर प्रचार आणि जनसंपर्क करून आपली मते शाबूत राहावीत, ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थिती कमकुवत होती, अशा ठिकाणी मोर्चे बांधणी करणे यालाच त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ती एक प्रकारची अग्निपरीक्षाच होती. लोकसभा निवडणुकीत आता मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेची तयारी सुरू होईल,
विद्यमान आमदार कोरोटे यांच्यासाठी आकडेमोड महत्त्वाची असणार आहे.
या लोकसभा मतदारसंघात फेरबदल होण्याची शक्यता निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. अशाही स्थितीत आकलनामुळे हुरळून न जाता जमिनीस्तरावर प्रचार आणि जनसंपर्क करून आपली मते शाबूत राहावीत, ज्या  ठिकाणी काँग्रेसची स्थिती कमकुवत होती, अशा ठिकाणी मोर्चे बांधणी करणे यालाच त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ती एक प्रकारची अग्निपरीक्षाच होती. लोकसभा निवडणुकीत आता मिळालेल्या यशानंतर आता – विधानसभे करीता कांग्रेस पक्षाची तयारी सुरू होईल हे नक्की.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments