Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन : एम.मुरुगानंथम

बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन : एम.मुरुगानंथम

गोंदिया : लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे.सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते.त्यामुळे पालकांनी आपल्या बालकास जवळच्या आशांमार्फत लसीकरण सत्रात जावुन लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी केले आहे.आरोग्य विभागामार्फत गावपातळीवर प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते.लोकांनी जबाबदारीने आपले बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावे.नागरिकांनी बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करुन घ्यावे.तसेच बाळाला जन्मतः स्तनपान व बिसीजी,पोलिओ,हिपॅटायटीस-बी,व्हिटँमिन-के चे पंचःसुत्री लसीकरण देवुन कवच कुंडले प्रदान करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.

प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्यात येत असुन खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण सुद्धा अवश्य करुन घेण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी केले आहे. जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ,पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस,पीसीव्ही,आयपीव्ही,गोवर-रुबेला,जेई,डिपीटी,व्हिटँमिन-अ डोज ई.विविध लसीकरण मोफत दिले जात आहे.जागृत राहुन पालकांनी आपल्या बालकास वयोगटातील सर्व लसीकरण करुन बालकाच्या शरीरात विविध आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण करावी तसेच कुपोषण व बालमृत्यु रोखण्यासाठी नियमित लसीकरण वेळेत करण्याचे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये, भारताने आरोग्यविषयक परिणामांमध्ये, विशेषतः बाल आरोग्य आणि लसीकरणात लक्षणीय सुधारणा केली आहे. 2014 मध्ये देश पोलिओमुक्त असल्याचे प्रमाणित करण्यात आले आणि 2015 मध्ये माता आणि नवजात टिटॅनसचे उच्चाटन करण्यात आले आहे.गोवर-रुबेला, न्यूमोकोकल कॉन्ज्युगेट लस (पीसीव्ही) आणि रोटाव्हायरस लस (आरव्हीव्ही) यासह नवीन लसींचा देशव्यापी परिचय आणि विस्तार करण्यात आला आहे.
लसीकरण ही प्राथमिक आरोग्य सेवेची गुरुकिल्ली आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी लस देखील महत्त्वपूर्ण आहेत.
मुलांना लस देण्यास घेऊन जाताना पूर्वीचे अहवाल घेऊन जावेत. काहीवेळा मुलांना देण्यात येणाऱ्या लसीची अॅलर्जी असू शकते. कोणत्याही लसीचे बहुधा गंभीर परिणाम होत नाहीत. लसीनंतर काही विपरित परिणाम व्हायचा असेल, तर तो काही मिनिटांपासून ते काही तासांच्या कालावधीत होतो.त्यामुळे लसीकरणानंतर किमान अर्धा तास लसीकरणाच्या ठिकाणी थांबणे आवश्यक असते.अॅलर्जीचा परिणाम झाला, तर श्वसनास त्रास होणे, भोवळ येणे, ओठ, घसा यांना सूज येणे, त्वचेवर लाल चट्टे उठणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, घसा बसणे, धाप लागणे अशी लक्षणे असतात. यापैकी कोणतेही लक्षण दिसले, तर लगेचच डॉक्टरकडे जावे. लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे.एक वर्षांच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे.

अत्याधुनिक लसीकरण तंत्रज्ञानाचे फायदे
लसीकरण कार्यक्रम यु-विन पोर्टलद्वारे देखरेख होत आहे.
शितसाखळी ई-विन कार्यप्रणालीमुळे दररोज तापमान देखरेख होत असल्यामुळे लाभार्थ्याला सुरक्षित लस मिळत आहे.
लाभार्थ्याला कुठल्याही ठिकाणी लसीकरण होऊन संगणकीय प्रमाणपत्र मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments