भरधाव ट्रकने सायकलस्वारास चिरडले, राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा चौकातील घटना

0
297

गोंदिया : भरधाव ट्रकने एका सायकलस्वाराला चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथे घडली. या घटनेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने सदर सायकलस्वाराचा चेंदामेंदा झाला.
मृत व्यक्ती हा सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील असल्याची प्राथमिक माहिती असून तो शनिवारी सकाळी सडक अर्जुनी कडे कामावर जात असताना कोहमारा येथील नवेगावबांध रोड चौकात ९.४५ वाजताच्या सुमारास नागपूरकडून रायपूर कडे जात असलेल्या ट्रक क्र.एन एल ०१ एइ ७१३४ च्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली. यावेळी तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, ट्रक चालकाला ट्रक सह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here