Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनमर्जीपना भोवला, ल.पा.चे प्रभारी उपविभागीय अभियंता मायकल फुंडकर निलंबीत

मनमर्जीपना भोवला, ल.पा.चे प्रभारी उपविभागीय अभियंता मायकल फुंडकर निलंबीत

प्रकरण बोळदे कवठा तलाव : शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
गोंदिया : मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत बोडदे कवठा येथील मामा तलाव गट क्रमांक ३१ येथे तलावाची पाळ फोडून स्वमर्जिणे काम करून शेतकऱ्यांना नुकसान पोहचविणाऱ्या प्रभारी उपविभागीय अभियंता मायकल फुंडकर याचे नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प गोंदिया यांनी निलंबन केले.या कारवाईमुळे तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे.मात्र तलावाच्या विसर्गामुळे शेतमालचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत.
याबाबत सविस्तर असे की अर्जुनी मोर.तालुक्यातील बोळदे/ कवठा येथील मामा तलाव २९ नोव्हेंबर रोजी मधोमध फुटून तलावातून विसर्ग सुरू झाला. शेतकऱ्यांच्या शेतजमीनीत पाणी शिरले परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग गोंदिया यांना कळवले, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी मौका स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली तलावाच्या मध्यभागातून तलाव फुटल्याचे निदर्शनास आले तलाव फुटल्यामुळे पाण्याच्या विसर्गातून शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी झाली. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला.याबाबत स्थानिक अभियंता व प्रभारी जलसंधारण अधिकारी मायकल फुंडकर यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत तलावाच्या सांडव्याचे काम सुरू असल्याने तलावाची पाळ जेसीबीने फोडल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे मायकल फुंडकर यांनी वरिष्ठांची कुठलीही परवानगी न घेता स्व-मर्जीने कामात कर्तव्यात बेजबाबदारपणा करून शासनाची आर्थिक नुकसान व दिशाभूल केली.कर्तव्यात कसूर केल्यामुळे कारवाईस पात्र ठरत असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम १९६४ चे कलम ३ मधील तरतुदी तरतुदीनुसार गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यांनी दि. ०३.१२.२०२४ रोजी निलंबन केले आहे. त्यांचे मुख्यालय पंचायत समिती सालेकसा येथे करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी वाय. जी. बरडे उप विभागीय अभियंता सालेकसा यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments