रात्रीला रेतीची अवैध वाहतूक

0
304

गोंदिया : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम फुटाळा येथून रात्री रेतीची वीणा परवाना अवैधरित्या वाहतूक जोमात सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येते आहे.
फुटाळा ते सौंदड या भागातील चुलबंद नदी पात्रातील वाळूचा उपसा रविवारी रात्रीला करण्यात आला. त्यातच काही वाहनाने या ठिकाणातील वाळूची वाहतूक देखील केली. त्यामुळे सौंदड गावात पिण्याचे पाणी वाहून आणणारी पाइप लाईन या वाहनांनी काही ठिकाणी फोडली. त्यामुळे पाण्याची नासाडी देखील झाली. वाळू वाहतुकीचा कार्यक्रम रविवार नंतर बंद होता. त्या नंतर आज रात्रीपासून पुन्हा वाळू वाहतुकीला जोर आले. नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करण्याची सध्यातरी परवानगी नाही. असे असले तरी वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र तालुका महसूल विभागाचे अधिकारी सध्या कुंभकर्णी निंद्रा अवस्थेत आहेत. तालुक्यातील त्या पाच घाटाच्या नदीपात्रातून वाळूचा उपसा खुले आम चालू आहे. अश्यात तालुका प्रशासन शांत रित्या गमत पाहत असल्याचे चित्र आहे. यावरून असे लक्ष्यात येते की या कारभारात मोठे मासे शामील आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा बग्याच्या भूमिकेत आहे. कुंपणच शेत खात असल्याने त्यांना टोकणारे कोण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here